Hot Posts

6/recent/ticker-posts

लातूर लोकसभा मतदार संघातून डॉ.शिवाजी काळगे विजयी

 लातूर लोकसभा मतदार संघातून डॉ.शिवाजी काळगे विजयी 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174 


लातूर: लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे विजयी हे 61881 एवढ्या मताधिक्याने विजय घोषित झाले आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण 28 उमेदवार होते, प्रमुख लढत ही काँग्रेसचे शिवाजी काळगे आणि भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यात झाली. पोस्टलसह पूर्ण मताची मोजणी केल्यानंतर डॉक्टर शिवाजी काळगे यांना 609021 एवढे मते मिळाली तर सुधाकर शृंगारे यांना पाच लाख 47 हजार 140 एवढे मते मिळाली. एकूण मताची बेरीज बारा लाख 40 हजार 614 एवढी आहे या निवडणुकीत  नोटा ला 1535 एवढी मते मिळाली. या निवडणुकीतील तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर यांना 42 हजार 225 एवढे मते मिळाले आहे. डॉ. काळगे यांना विजय मिळवले बाबतचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सौ वर्षा ठाकूर घुगे यांनी नुतन खासदार डॉ शिवाजीराव काळगे याना देण्यात आले त्यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments