कासार सिरसी पोलीस स्टेशन जिल्ह्यात प्रथम स.पो.नि. रियाज शेख, पो.कॉ. बालाजी बन यांची उत्कृष्ट कामगिरी
मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : कासार सिरसी पोलीस स्टेशन च्या वतीने मागील कालावधीत उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने अनेक वेळा उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई, उत्कृष्ट समन्स बजावणी, उत्कृष्ट वॉरंट बजावणी, CCTNS डेटा फिडिंग इत्यादी बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून दर महिन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशनची निवड करून त्यांना मा पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येतात.
माहे एप्रिल/2024 या महिन्यामध्ये, पोलीस खात्यातील ऑनलाईन कामकाज साठी अस्तित्वात असलेल्या सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून लातूर जिल्ह्यातून सर्वप्रथम आल्या बद्दल दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात कासार शिरसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज मुनीर शेख व पोलीस अंमलदार बालाजी रामराव बन यांचा मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे , मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे सर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सदर सीसीटीएनएस प्रणाली कामकाजामध्ये पोलीस स्टेशन कासार शिरशीचे अंमलदार बालाजी बन यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्व डेटा फीडिंग सीसीटीएनएस मध्ये केलेली होती.
कासार शिरसी पोलीस स्टेशनला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल निलंगा पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कासार शिरसी पोलीस स्टेशन कडून मागील कालावधीत उत्कृष्ट कामगिरी होत असल्याने उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई, उत्कृष्ट समन्स बजावणी, उत्कृष्ट वॉरंट बजावणी, CCTNS डेटा फिडिंग इत्यादी बाबतीत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
0 Comments