Advertisement

हंडरगुळीतला ऊस तु-यात,शेतकरी संकटात.. रिकव्हरी कमी येणार

 हंडरगुळीतला ऊस तु-यात,शेतकरी संकटात..

रिकव्हरी कमी येणार



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


 हंडरगुळी : ऊस हे नगदी दाम देणारे पीक असुन हंडरगुळी परिसरातील बहूतांश शेती ऊसाची आहे.आणी लेकरांप्रमाणे या पीकाची जोपसना करतात.तरी पण इतर पीकाप्रमाणे ऊसावर ही निसर्ग घाला घालतोच घालतो.तरीही ऊस लागवड कमी होण्याऐवजी वाढतेच. सध्या ऊसतोडीचा मोसम असल्याने अनेकजण गाळप करतात.तर अनेक जण कारखान्याला देतात.सध्या या परिसरात गाळपायोग्य झालेले कांही शेतक-यांचा ऊस पांढ-या केसाने (तु-याने) माखलेला दिसत आहे.व तुरे फुटल्याने वजन,रिकव्हरी कमी होऊ शकते.अन् पुन्हा शेतकरीबांधव आर्थीक संकटात येणार!अशी भीती वर्तवली जाते.

नगदी दाम देणारे पीक म्हणुन अनेक पाणीदार शेतकरी ऊसाची लागवड करतात.आणि वेळीअवेळी ऊसाला पाणी देतात.त्याची निगा करतात.

तरीही निसर्गाचा प्रकोप होतो.आणि पदरी घाटा पडतो.हे शेतक-यांच्या पाचवीलाच पुजले आहे.आणि आता पण असाच कांहीसा प्रकार ऊसाच्या बाबतीत घडताना दिसतोय.

कारण,एकीकडे वयोमान झालेला ऊस कुणी कारखान्याला देतोय.तर कुणी गाळतोय.तर दुसरीकडे अनेक ठिकाणचे ऊस पांढ-या तु-यामध्ये डोलताना दिसतात.व तुरे फुटल्याने वजन कमी होऊन घाटा होऊ शकतो अशी भीती वर्तवली जात आहे.

हा परिसर तिरु मध्यम प्रकल्पाच्या पाण्याखाली येतो.म्हणुन बहूतांश शेतक-यांनी तळ्यावरुन पाईपलाईन अंथरुन शेतात(विहीरीत)पाणी घेतले आहे.म्हणुन तसेच यंदा भरपुर मोठा पाऊस झाल्याने ऊसाची लागवड ही मोठ्याप्रमाणात होत आहे.तसेच उदगीर,अहमदपुर,देवणी तालुक्यात असलेल्या कारखान्यामुळे गाळपाचे टेन्शन कमी झाले आहे.परंतू,यंदा ऊसाला अतिपावसाबरोबरच आर्द्रता वातावर बदल यासारख्या घटकांचा फटका ऊसाला बसल्याचे दिसते. आता तुरे वाढत चालल्याने आतुन ऊस पोंग होतो नी त्याचे वजन कमी होते.यामुळे शेतक-यांवरील संकटाचे सावट कांही झाले तरीही कमी होत नसल्याचे दिसते.

तिरु मध्यम प्रकल्पासह संगाचीवाडी राचन्नावाडी तलाव तसेच अनेक साठवण तलाव हंडरगुळी शेजारी असल्याने ऊसाची लागवड वाढलीय 

यंदा झालेला अतिपाऊस तसेच ताप मानातील होणारा बदल,जमिनीत पाणी साचणे,वेळेवर तोड न होणे,इ. कारणामुळे पण ऊसाला तुरे फुटतात तेंव्हा प्रशासनाने माती व पाण्याची तपासणी करुन मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

माने बालाजी संभाजी,शेतकरी

हंडरगुळी

हवामान,आर्द्रता यात सतत होणारा बदल,सततचा पाऊस यामुळे ऊसाचे वावरात साचलेले पाणी,जमिनीमध्ये  नञ कमी असणे,तसेच खोडवा ऊस लवकर तु-यात येतो.तसा नवा येईना यासाठी लागवड योग्य वेळीच करणे तसेच तज्ञांचा सल्ला घेणे ही गरजेचे असते,

राजेश मुळजे,वाढवणा बू.मंडळ क्रषी अधिकारी,ता.उदगीर...

Post a Comment

0 Comments