Advertisement

​ओंकार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ​ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २,९०० रुपये प्रति टन प्रमाणे पहिला हप्ता जाहीर; चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांची माहिती

 ​ओंकार साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांसाठी खुशखबर!

​ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २,९०० रुपये प्रति टन प्रमाणे पहिला हप्ता जाहीर; 

चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांची माहिती




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



​निलंगा : निलंगा तालुक्यातील आंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, निलंगा, युनिट नं. २ म्हणजेच ओंकार साखर कारखान्यानेने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊसाला एफआरपीपोटी प्रति मेट्रिक टन २,९०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

​ओंकार साखर कारखाना युनिट नं. २ चा २०२५-२६ चा गळीत हंगाम यशस्वीरित्या सुरू आहे.

​दिनांक ०८ डिसेंबर २०२५ अखेर कारखान्याने ८० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

​१० नोव्हेंबर २०२५ अखेर गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाचे पेमेंट एफआरपीपोटी प्रति मेट्रिक टन २,९०० रुपये या दराने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.

​शेतकऱ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की, हा दर अंतिम नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी भविष्यात अधिक चांगला दर देण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे.

​दिवाळी भेट म्हणून मोफत साखर:

​तसेच, मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कारखान्याकडे गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना दीपावली सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.

​चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी कारखाना सातत्याने प्रयत्नशील आहे.

Post a Comment

0 Comments