स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती बंद करा
शिवसेना सहकार जिल्हा अध्यक्ष किशोर जाधव यांची मागणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
औसा : वीजदराबाबत मोठी तफावत, सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यास विरोध, वीज समस्या, वाढीव बिल, फॉल्टीमीटरबाबत स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये असे निवेदन मुख्यमंत्री यांना मेल द्वारे शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जाधव यांनी दिले
स्मार्ट मीटरमुळे बिल वाढते, गोपनीयतेचा भंग होतो, जबरदस्ती केली जाते, काही ठिकाणी स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात आंदोलन झाली आहेत. या सर्व ग्राहकांच्या तक्रारींचा विचार करून २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य ग्राहकांसाठी (घरगुती आणि लहान व्यावसायिक) स्मार्ट मीटर अनिवार्य केले जाणार नाहीत, असे म्हटले होते. मग आता महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती का केली जात आहे,
आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याबाबत आणि डिपॉझिट भरण्याबाबत बंधनकारक केले, तर त्यांना शिवसेना स्टाइलने धडा शिकवला जाईल, तसेच याविरोधात मोठा जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेना सहकार सेना जिल्हाप्रमुख किशोर जाधव व शिवसेना सहकार सेना तालुका प्रमुख श्रीहरी उत्के यांनी दिला आहे


0 Comments