भोईसमुद्रगा येथे शेतकरी अनुभव प्रात्यक्षिक व प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : भोईसमुद्रगा (ता. लातूर) येथे शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक अनुभव प्रात्यक्षिक व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन ट्वेंटी फर्स्ट शुगर लातूरचे व्हाईस चेअरमन श्री. विजय देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
हा कार्यक्रम सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेड आणि विल ग्रो – Powering Livelihoods यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक राव आप्पा काळे, माजी व्हाईस चेअरमन विकास कारखाना रवी काळे, कृषी विज्ञान केंद्र लातूरचे देशमुख साहेब, तसेच सेंटर चालक सुरेखा कल्याण देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाला भोईसमुद्रगा गावचे सरपंच बळीराम साळुंके, विल ग्रो फाउंडेशनचे श्रीजीत नारायण, पूजा रवींद्र, देवदयाल सोलर कंपनीचे आर. सी. सोनी (सीओ), गौतमी आचार्य, सिस्टमा बायोचे खुरम मुजावर, तसेच अमन वर्मा (रहेजा सोलर) या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तबस्सुम मोमीन यांनी केले, तर स्वयं शिक्षण प्रयोगचे उपमन्यू पाटील यांनी प्रकल्पाविषयी मार्गदर्शन केले.
सखी युनिक रिसोर्स एंटरप्राइज प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ राहुल हुडे यांनी विविध उत्पादनांविषयी सविस्तर माहिती दिली.
या केंद्राचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सोलार ड्रायर, डीडी सोलार फ्रिजर, हायड्रोपोनिक युनिट, नियो स्प्रेअर, ऑटो स्टुडिओ स्प्रेअर यांसारख्या नवतंत्रज्ञान आधारित उत्पादनांची माहिती देणे हा आहे.
या सर्व उत्पादनांचे प्रदर्शन पुढील कालावधीसाठी या केंद्रावर चालू राहणार असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला सुमारे 450 महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कल्याण देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले, तसेच भोईसमुद्रगा गावच्या सखी कुशावती चोथवे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहिणी घोडके, माधुरी दूधभाते, अंजना साबळे आणि ज्ञानेश्वर नावडकर, माधव गोरकटे यांनी विशेष मेहनत घेतली.



0 Comments