धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची उप तालुका प्रमुख जगन्नाथ मनाळे यांनी घेतली सदिच्छा भेट
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
धाराशिव : शिवसेना उबाटा गटाचे उप तालुका प्रमुख जगन्नाथ मनाळे यांनी दीपावली निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत सविस्तर चर्चा केली.यावेळी एकोजी मुदगड येथील ज्येष्ठ नागरिक सीताराम हराळे गुरुजी, दिनकर सूर्यवंशी ग्रामीण वार्ता पत्र न्युजचे मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी यांची उपस्थिती होती.यावेळी तेरणा नदीच्या तीरावर असलेले अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
अतिवृष्टीमुळे उभे पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यांत भविष्याबद्दलची काळजी व असहाय्यता दिसून येत आहे. या परिस्थितीत अनेक शेतकरी अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासून वंचित आहेत. यामुळे आपण स्वतः जातीने शासन स्तरावर लक्ष वेधून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निलंगा, औसा येथील शेतकऱ्यांना सदिच्छा भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले “अशा कठीण काळात शेतकरी आणि ग्रामस्थांचा विश्वास जपण्यासाठी व त्यांचा आनंद परत आणण्यासाठी आम्ही सतत लढा देत राहू.”
शेतकऱ्यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यावेळी एकोजी मुदगड, सरवडी ग्रामस्थांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.




0 Comments