राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी शेतकऱ्यांना दिलेले कागदी अडचणी शिवाय सरसकट मदन देणार
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भागात दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या पिकांवरील नुकसानविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,सरकार कोणतेही निकष, कागदी अडचणी किंवा चौकटी आड येऊ देणार नाही. सर्व शेतकऱ्यांना सरसकट आणि भरघोस आर्थिक मदत केली जाईल.
नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात येतील व मदतीचा ओघ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल.
जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी तातडीने अहवाल सादर करतील, तसेच यावेळी स्थानिक शासकीय यंत्रणांना मदतकार्य सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
दीर्घकालीन दृष्टीकोनातून सिंचन व्यवस्था, पूरनियंत्रण यंत्रणा आणि पावसाळी नियोजन अधिक भक्कम करण्याची हमी दिली.
यावेळी स्थानिक राजकीय अधिकारी, प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी यांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांनी झालेल्या शेती पिकांचे मोठे नुकसान, घरे-पशूंची समस्या इत्यादी आपली बिकट परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
यामुळे धाराशिव , लातूर परिसरातील शेतकरी वर्गाला मुख्यमंत्री फडणवीस सरकार कडून दिल्या गेलेल्या आश्वासनामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार राणा जगजितसह पाटील यांच्या सह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.



0 Comments