Advertisement

उद्धव ठाकरेंनी साधला मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद

 उद्धव ठाकरेंनी साधला मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी संवाद 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174



धाराशिव/लातूर : उद्धव ठाकरे मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर आले असता, धाराशिव जिल्ह्यातील इटकूर येथे पाहणीवेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या सरकारला तुमच्यावर अन्याय करू देणार नाही, हे सांगायला मी येथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य वेळ कधी येणार? त्यासाठी आता पंचांग पाहणार आहात का? असा उपरोधिक सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. 

गेल्या चार दिवसांपासून मराठावाड्यातील धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांची संपूर्ण पिके पाण्याखाली गेली आहेत.  तर जमिनीवरील मातीही खरडवून गेली आहे, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.यावेळी 

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यात प्रथमच असे संकट कोसळले आहे. समस्या खूपच बिकट आहे, पण अशा संकटावेळी सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करू देणार नाही, हे सांगायला आलेलो आहे.

तुम्ही पंचांग पाहणार आहात का?

आजच्या या संकटात केवळ शेतकऱ्यांची शेती वाहून गेली नाही, तर त्यांचे आयुष्य वाहून गेले आहे. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? कशी घोषणा केली? यावर मी नंतर बोलेन. पण तूर्त सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, योग्य वेळी अमुक करू, तमुक करू असे सरकार दरवेळी सांगते. पण तुमची योग्य वेळ येणार कधी?  त्याच्यासाठी तुम्ही पंचांग पाहणार आहात का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

 संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, यासाठी हीच योग्य वेळ आहे. त्याला कर्जमुक्त करा, अशी पहिली मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. सरकाराने काय मदत केली हा वेगळा भाग आहे. पण आम्हाला हेक्टरी सरसकट 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.अडीच हजार कोटींची मदत तुटपुंजी या पुरात शेतीचे फक्त नुकसानच झालेले नाही. जमीनच खरडून गेली आहे.  आज सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. 

वेडेवाकडे पाऊल उचलू नका सरकारने पीकविम्याचे निकष बदलले आहेत. आज माझ्या हतात काहीही नाही. मी फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. मी सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो की वेडेवाकडे पाऊल उचलू नका. वाईट दिवस जातील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून नये असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments