तोंडारच्या साखर कारखान्यापुढील महामार्गावर खड्ड्यांनी पुर्ण केले शतक
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : उदगीर ते शिरुर ताजबंद जाणा-या महामार्गावर सर्वञ खड्ड्यांची मोठे साम्राज्य पसरले असून तोडांर पाटी जवळी साखर कारखान्यासमोरुन जाणा-या उदगीर रोडवर एकाच ठिकाणी लहान-मोठे असे किमान १०० तरी खड्डे असतील.म्हणुन या एकाच ठिकाणी खड्ड्यांनी शतक पुर्ण केले आहे.तर या महामार्गावर लाखोंच्या संख्येत खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.अन् खड्डे किती खड्डे किती,
कंबर लचकली..!
असेही चालकांसह प्रवाशांमधून म्हटले जाते.तेंव्हा या खड्ड्यांची दुरुस्ती एखादा मोठा अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचे प्राण गेल्यावर बांधकाम विभाग करणार आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशी व वाहन चालक,मालक प्रशासनाला विचारत आहेत.राज्याचे बांधकाम मंञीच या जिल्ह्याचे पालकमंञी असताना त्यांच्याच अखत्यारित असलेल्या रोडची चाळणी व्हावी.हे पालकमंञी महोदयांना मान्य आहे,का?असा प्रश्न वाहनधारकांसह प्रवाशांमधून विचारला जात आहे..
*अभियंत्याचा नो रिस्पाॅन्स*
या बाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता बांधकाम विभाग उदगीरचे अभियंता सुनिल नरहरे यांनी फोन घ्यायचे कष्ट घेतले नाहीत



0 Comments