हाळी-हंडरगुळीत वाहतूक व्यवस्थेचा बेशिस्तपनांनी गाठला कळस
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : उदगीर शहरानंतर या तालुक्यात सर्वात मोठे व राज्य मार्गालगत मोठी बाजारपेठ असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावात सगळीकडे हजारो छोटी - मोठी वाहने येत-जात असतात. त्या पैकी शेकडो वाहने कुठेही व कशीही *पार्क* केलेली असतात.यामुळे कधी व कसा अपघात होईल याचा भरोसा नाही.म्हणुन येथे वाहतूक व्यवस्थेचा 'बॅंण्ड" वाजल्याचे सामान्य जनतेला दिसते. तेंव्हा या अशा वाहतूकीवर योग्य ती कारवाई करणार कोण? असा प्रश्न सुजान हाळी- हंडरगुळी करांमधून चर्चीला जात आहे.
उदगीर शहरानंतर या तालुक्यातले सर्वात मोठे गाव व बाजार पेठ असलेल्या हाळी-हंडरगुळी येथे या परिसरातील ५०/६० गावातील सर्व सामान्य जनता विविध कामानिमित्य ये-जा करतात.व त्यापैकी अनेकजन त्यांच्याजवळील गाडी वेडी-वाकडी कुठेही "पार्क" करत असल्यामुळे या रोडवर सतत वाहतूक कोंडी होते.यामुळे अपघाताची शक्यताही नाकारत येत नाही.आणि या जिवघेण्या बेशिस्त वाहतूकीबद्दल यापुर्वी अनेकदा पोलीस चौकीत शांतता समितीच्या बैठकीत हाळी व हंडरगुळीतील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले असता,तेंव्हाच्या सपोनी यांनी फक्त कारवाई करण्याचे आश्वासन दिले.पण बेशिस्त वाहतूकीवर कारवाई कांही केली नाही.म्हणुनच येथे बेशिस्त वाहनधारकांचा मुजोरपणा व बेशिस्तपणा वाढला.तसेच येथील बेशिस्त वाहनांना शिस्त कधीच लागणार नाही का?असा संतप्त सवाल या वाहनांमुळे ञस्त झालेली हाळी-हंडरगुळीकर जनता संबंधित प्रशासनाला विचारत आहे.
नुतन सपोनि.एस.पी.गायकवाड यांनी पदभार घेताच २० जुन रोजी वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी मोहिम सुरु केली होती.तेंव्हा कायदा मोडणा-यांवर कारवाही पण केली होती. म्हणुन या सपो.निरिक्षकाची व कारवाहीची धास्ती वाहन चालक,मालक मंडळीनी घेतली होती.तर या कारवाईचे हाळी-हंडरगुळीकरांतुन कौतूक तसेच स्वागत होत होते.पण नंतर माञ का व कशामुळे हि मोहिम,कारवाई थंडावली हे कळायला मार्ग नाही.
आमच्या दुकाणासमोरुन गाडी काढा,येथे ग्राहकांना ये-जा करायला ञास होतोय.असे नम्रपणे म्हणणा-या कांही दुकाणदारानाच कांही मुजोर वाहन चालक मंडळी अरेरावी करतात.आणि दिवस दिवस बेशिस्तीत गाड्या उभा करतात.
संजय गंदेवार,धनलक्ष्मी बेकरी मालक..
मासरेडसह अन्य कामांमध्ये बिझी असल्याने वाहनांवरील कारवाईची मोहिम कांही दिवस बंद होती.पण आता पुन्हा ही मोहिम सुरु करुन सर्व बेशिस्त वाहनधारकांवर योग्य ती कारवाई करणार आहोत.
सुनिल गायकवाड, सपोनि.वाढवणा



0 Comments