वृक्षारोपणासह विविध उपक्रमाने कासार शिरसीत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
कासार सिरसी : कासार सिरसी भाजपा मंडळ शेंडगे रिसर्च हॉस्पिटल उमरगा कानडे हॉस्पिटल कासार शिरसी यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा वाढदिवस कासार शिरसी शहरात साजरा करण्यात आला या उपक्रमास जनतेतून उत्तम प्रतिसाद लाभला यात 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 200 गरजूं रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली
कासार शिरसी मंडल अध्यक्ष नाना धुमाळ माजी अध्यक्ष ज्ञानेश्वराव वाकडे यांचे सह अनेक मान्यवरांच्या संकल्पनेतून सामाजिक उपक्रमांतर्गत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्य *एक पेड मा के नाम* या संकल्पनेनुसार येथील बसस्थानकात आमदार पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर मतिमंद शाळेत गरजू मुलांना फळाचे वाटप गरीब व विधवा दोनशे महिलांना साडी चोळीची वाटप करण्यात आले आयोजित सर्व रोग निदान शिबिरात 200 जणांची तपासणी करण्यात आली तर ६० जणांनी रक्तदान केले याप्रसंगी येथील उपसरपंच अप्पू चिंचनसुरे जिलानी बागवान मयूर गबुरे धनराज होळकुंदे यांचे सह ओम बिराजदार नितीन पाटील बालाजी बिराजदार मुळे बळी पाटील आदी मान्यवर हजर होते.


0 Comments