वंचित लाभार्थ्यांचे त्वरित वितरण करत निराधारांच्या नियमात बदल करावा व त्यांच्या मानधनात वाढ करावी संघटनेचे शासनास निवेदन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : अखिल भारतीय मराठवाडा प्रदेश निराधार संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर दादाराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन निलंग्याचे तहसीलदार यांना अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले
तब्बल दहा महिन्याचा कालावधी संपला अद्याप या लाभार्थ्यांची बैठक घेण्यात आलेली नाही बैठक घेण्यात यावी मंजूर यादी जाहीर करावी या अंतर्गत लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी व या योजनेतल्या लाभार्थ्यांच्या नियमात शिथिलता आणावी वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांवरून एक लाखापर्यंत करण्यात यावे वय 65 ऐवजी साठ करण्यात यावे लाभार्थ्यास एक हेक्टर जमीन मान्य करावी विकलांग किंवा अंथरणावर पडलेल्या लाभार्थ्यांना घरपोच मानधन पोचवावे तर असंख्य निराधार विधवा महिला या लाभांपासून वंचित आहेत त्यांचे वितरण करण्यात यावे अशी विनंती देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे नियमित काही लाभार्थ्यांना मानधन मिळत असल्याने या निवेदनात प्रशासनाचे आभार मानण्यात आले याप्रसंगी सर्वश्री माधव सूर्यवंशी, माधव चपटे, राम सूर्यवंशी, प्रशांत सोळंके, दत्तात्रेय कांबळे, लता कांबळे, नरसिंग कांबळे, गुंडप्पा ईश्वरे, विलास फुलचंद पांचाळ, सादिक खान आदी मान्यवर यांची उपस्थिती होती.


0 Comments