कोकळगाव येथे कर्करोग निदान शिबिर संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : दि.16 जुलै 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय लातूर यांच्या वतीने कर्करोग मोबाईल व्हॅन आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे आली. यामध्ये कोकळगाव, रामतीर्थ, कामलेवाडी, मुदगड (ए) येथील 28 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 7 रुग्ण संशयित आढळले. त्यांना पुढील उचारासाठी संदर्भित करण्यात आले.
कर्करोग मोबाईल व्हॅन तपासणी शिबिर मा.उपसंचालक डॉ.अर्चना भोसले , मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप ढेले , मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे , मा.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव , प्रा.आ.केंद्र मदनसुरी मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा मुळजे , डॉ.शितल साळुंके यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.
आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी डॉ.साळुंके, डॉ.चव्हाण , अधिपरीचरिका गिरी , फार्मासिस्ट निसार यांनी केली. यावेळी आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगावचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रुमणे, आरोग्य कर्मचारी श्री.राहुल भोसले, आरोग्यसेविका श्रीमती.सी.के. जाधव, कमलबाई सूर्यवंशी ,वाहनचालक श्री राऊत व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.



0 Comments