उदगीरचा शेतकी विभाग हाळीतील बांधावर
शेतक-यांकडुन जाणुन घेतल्या अडी अडचणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
हंडरगुळी : हाळी-हंडरगुळी परिसरातील उदगीरच्या शेतकी विभागाने दि.१६ जुलै रोजी १२ वाजता हाळी-हंडरगुळी शेत शिवारातील खरिप पिकांची पाहणी केली. आणि पिक व्यवस्थापण व गोगलगाय तसेच अन्य रोगराईबद्दल मार्गदर्शन केले.
यंदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव हा अत्यंत कमी आहे.आणि जेथे थोडे फार आहेत. त्या वावराच्या कडेने गुळाच्या पाण्यात भिजवलेले पोते ठेवावे किंवा स्नेकनिलचा वापर करावा,तालुका शेतकी विभाग सदैव शेतक-यांच्या सेवेत हजर आहे.अशी माहिती यावेळी तालुका प्रभारी शेतकी अधिकारी एम.डी.कांबळे , वाढवणा मंडळ शेतकी अधिकारी राजेश मुळजे यांनी दिली.
यावेळी हाळीचे सहाय्यक विनोद धुळे , हंडरगुळीचे क्रषी सहाय्यक मनोज करकीले,शेतकरी सुनिल काळेगोरे , जेष्ठ पञकार पप्पू पाटील,पञकार लक्ष्मिकांत मोरे,पिंन्टू काळवणे हे उपस्थित होते.
यावेळी अधिका-यांनी हाळीहंडरगुळी शिवारातील बहूतांश शेतीपिकांची पाहणी केली.



0 Comments