जिल्ह्यात नागपंचमी उत्साहात साजरी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : शहरासह जिल्ह्यात व ग्रामीण भागात मंगळवारी मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी नागराजाच्या मूर्तीचे सुहासिनींनी विधिवत पूजन केले. सकाळपासून शहरातील व ग्रामीण भागातील गावागावात नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दुपारनंतर शहरातील विविध उपनगरांत महिलांनी फुगड्यांचा फेर धरत आणि झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला.नागपंचमीच्या निमित्ताने शहरातील परिसरातील, मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी नागदेवतेचे दर्शन घेतले.
मंदिर परिसरात झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंद लुटण्यासाठी महिलांची चढाओढ लागली होती.
सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.काहीं ठिकाणी ग्रामीण भागात वारूळ पूजनासाठीही महिलांनी गर्दी केली होती.
शहरासह परिसरात मंगळवारी मोठ्या उत्साहात नागपंचमी पार पडली. विविध ठिकाणी नागराजाच्या मूर्तीचे सुहासिनींनी विधिवत पूजन केले. नागपूजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.




0 Comments