Advertisement

प्रमाणपत्राच्या वितरणा नंतर कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग उपोषण स्थगित

 प्रमाणपत्राच्या वितरणा नंतर कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग उपोषण स्थगित




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : जिल्ह्यातील सकल आदिवासी कोळी महादेव व कोळी मल्हार जमाती संघटना यांच्यावतीने मराठवाडा अध्यक्ष. मा. श्री. चंद्रहर्षजी नलमले यांच्या नेतृत्वात निलंगा उपविभागीय कार्यालयासमोर गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेल्या अन्नत्याग उपोषण आंदोलनाला आज भाजप युवा नेते प्रदेश सचिव श्री अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी भेट दिली.

यावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या भाऊ पाटील यांनी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे समाधान केले. तसेच त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याचा विश्वास देत, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत अखेर ९ दिवसांपासून सुरु असलेले हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. यावेळी सकल आदिवासी कोळी महादेव बांधवांना जातप्रमाणपत्रांचे वाटप देखील केले.

समाजातील कोणत्याही नागरिकाला त्रास होऊ न देणे, हीच आमची प्राथमिकता आहे. महायुती सरकार सर्व नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे सर्वांना त्यांचा न्याय्य हक्क जरुर मिळेल व तो मिळवून देऊ, असा विश्वास यावेळी सर्वांना दिला. समाजासंबंधी प्रलंबित असलेली सर्व प्रकरणे व अर्ज १५ ऑगस्ट पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना प्रशासना दिल्या. तसेच शासनस्तरावरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब याची भेट घेऊन त्यावर ही तोडगा काढू, असे वचन दिले.


*यावेळी उपोषणकर्ते माधवजी पिटले, बालाजी औटी, हरिश्चंद्रजी मुडे आदींनी आपले उपोषण सोडले. सामाजिक कार्यकर्ते रामभाऊजी काळगे, वीरभद्रजी स्वामी, तम्माजी माडिबोने, शहराध्यक्ष रवीजी फुलारी, अप्पारावजी सोळुंके यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.


उपोषणकर्त्यांकडून करण्यात आलेल्या मागण्या :

- टीसी, बोनाफाईड व वडिलधाऱ्या नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र अंधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

- अकरा महिन्यांपूर्वी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे.

- महाराष्ट्र शासनाने १९६६ प्रमाणे ३६ व ३६ अ नोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबारावर नोंदणी करावी व त्याआधारे प्रमाणपत्र देण्यात यावे.

- वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी रक्तनात्याचे परिपत्रक काढावे.

- अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयप्रमाणे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

- आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, ढोर कोळी यांचा १९५० पूर्वीचा कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे.

Post a Comment

0 Comments