Advertisement

निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा शिक्षकानेच बांधला चंग मुख्याध्यापकाची मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे तक्रार

 निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा  शिक्षकानेच बांधला चंग

मुख्याध्यापकाची मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे तक्रार..


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


निलंगा : मौजे गुऱ्हाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद पाडण्यासाठी एक शिक्षकच प्रयत्न करीत असल्याची तक्रार या शाळेच्या मुख्याध्यापकाने  गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे  लेखी तक्रार  देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम हे जिल्हा परिषद गुऱ्हाळ या शाळेत मागील सहा वर्षापासून कार्यरत असून या काळात त्यांनी  गैरवर्तन केल्याप्रकरणी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल आहे.

मात्र या तक्रारीवर गट शिक्षण अधिकारी श्री. सुरेश गायकवाड  निलंगा यांनी ठोस स्वरूपाची कारवाई केल्याचे आढळून आलेले नाही.यामुळे श्री.सपकाळे पांडुरंग तुकाराम  हे आणखीनच निर्ढावलेले असून ते पालक व विद्यार्थ्यांना शाळेतून  T.C.घेऊन जाण्याचा अनाहूत सल्ला देत असल्याचा  संशय मुख्याध्यापकाने व्यक्त केला असून त्यांनी वरिष्ठाना दिलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे. की,सदरील शिक्षक हे शाळेबद्दल ग्रामस्थांना(पालकांना)खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन शाळेबद्दल अविश्वास निर्माण करीत असल्याचे मुख्याध्यापकाने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.त्यात त्यानी या षड्यंत्री करणाम्यामुळे मागील 2 ते 3 वर्षापासून पालकांकडून टी सी मागणीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे असे मुख्याध्यापकाने  तक्रारीत म्हटले आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुऱ्हाळ येथील शिक्षक वृंद यांनी  पालकांचे समूपदेशन करणे संबंधाने शाळा बचाव समिती स्थापन करून जि.प. शाळेतील T.C. इतरत्र  जाऊ नयेत याबाबत मा.सरपंच आणि अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गुन्हाळ आणि गावातील जागरूक नागरीक यांची  दि.२१जून२०२५ रोजी बैठक बोलावली होती. सदरील बैठकीत सकारात्मक विचार होत असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता पूर्व संचीत भावनेने शिक्षक श्री. सपकाळे यांनी मला शिकवण्याठी पाचवा वर्ग दिला असून माझी मागणी इयत्ता पहिली वर्गासाठी होती असे म्हणून वितंडवाद निर्माण करून शांततेचा भंग  केला. त्यावेळी संबंधित शिक्षक हे इयत्ता पहिली वर्गाचे प्रशिक्षण घेण्यास लेखी नोटीस काढूनही तयार नसल्यामुळे नियमाप्रमाणे पहिलीचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाला  पहिला वर्ग देण्यात आले. असे सांगत असतानाच संबंधित श्री. सपकाळे हे मोठ-मोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे पालकात चुकीचा संदेश गेला. पर्यायाने संबंधित शिक्षकाच्या गैरवर्तनामुळे सकारात्मकतेकडे आलेली बैठक बारगळली आणि पालकांची मानसिकता ही नकारात्मक झाली असल्यामुळे T.C. मागणीचा ओघ कसा थांबवायचा हा यक्ष प्रश्न  मुख्याध्यापका समोर  निर्माण झाला आहे. याठिकाणी विशेषत्वाने नमूद करण्यासारखी बाब म्हणजे ही वाईट वेळ अचानक उ‌द्भवली नसून पूर्वग्रहदूषीत भावनेने येथील काही विघ्नसंतोषी आणि कामचुकार व षडयंत्री लोकांशी संगनमत करून पध्दतशीरपणे केलेली व्यूहरचना असून याचे मुख्य सुत्रधार श्री. सपकाळे पांडुरंग तुकाराम  हेच  असल्याचा दाट संशयही तक्रारीत नमूद करण्यात आलेला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे दि.३१ जानेवारी २०२५ ला समायोजनाने बदली झालेल्या श्री नरहरे नामक शिक्षकाची बदली रद्द करणे संबंधाने मौजे गुऱ्हाळ येथील सरपंचाच्या नेतृत्त्वाखाली 20-22 लोकांनी शाळेत अनाधिकृतपणे प्रवेश करून विद्यार्थ्यांना हुसकाऊन लावत 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत शाळा बंद केली होती सदरील गैरप्रकारास श्री. सपकाळे यांनी प्रवृत्त केल्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना या अनुचित प्रकारामागे संबंधित शिक्षकाचा हात असल्याचा दाट संशय असल्याचा खातरजमा करण्यासाठी संबंधिताची सखोल चौकशी व सपकाळे याचे कॉल डिटेल्सची चौकशी  होणे नित्तांत गरजेचे आहे. सदरील शिक्षक हे गैरकृत्याबद्दल माहीर असून कोणतीही पूर्व कल्पना न देता वर्ग वाऱ्यावर सोडून गावात जाणे सूचनांचे पालन करीत नसून, सूचनेवर स्वाक्षरी करीत नाहीत. शाळेतील वस्तू घरी घेऊन जाणे त्या खराब करणे उदा. पाईप व

साउंड  शाळेतील साहित्याची नासधूस करणे, स्टेशनरी साहित्य गहाळ करणे, वर्ग एकत्र करून शाळेच्या प्रांगणात खुर्ची टाकून बसणे, शाळेत वेळेवर येणे नाही व पाऊल पडताक्षणी पंजिकेमध्ये शाळेत प्रत्यक्ष हजर झालेली वेळ न टाकता आपल्या पूर्वी आलेल्या शिक्षकांच्या वेळेइतकी वेळ नोंदवणे व सदरच्या प्रकाराबाबत विचारणा केली असता मोठ-मोठ्याने बोलत वितंडवाद करणे, आदी प्रकारचे गैरवर्तन सदरील शिक्षक करीत आहेत.

 अश्या प्रकारे कर्तव्यात कसूर करून गैरवर्तन करणाऱ्या आणि वारंवार नोटीसा काढूनही वितंडवाद निर्माण करीत शालेय प्रशासनात जाणीपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्या बेजबाबदार श्री. सपकाळे  यांची सखोल आणि पारदर्शकक व निःपक्ष पातीपणे चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि मौजे गुऱ्हाळ येथील पालकवर्गातून वाढत चाललेल्या T.C. मागणीच्या संदर्भात सुयोग्य असे मार्गदर्शन करावे अशी विनंती ही तक्रारी निवेदनात करण्यात आली आहे.

यावरून पंचायत समिती निलंगा येथील शिक्षण विभाग असे गैरकृत्य करणाऱ्या कामचूकार व षडयंत्री शिक्षकावर कारवाई करणार की त्यांना नेहमी प्रमाणे  पाठीशी घालणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments