Advertisement

निलंगा येथील वक्फ मंडळाच्या ईदगाह कॉम्प्लेक्समध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार

 निलंगा येथील वक्फ मंडळाच्या  ईदगाह कॉम्प्लेक्समध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार  

मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



निलंगा : निलंगा येथील वक्फ मंडळाच्या  ईदगाह  कॉम्प्लेक्स मध्ये  कमिटीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते शेख मुहम्मद  खुर्रम अब्दुल रशीद साहब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे लेखी स्वरूपात केली आहे.

दिलेल्या तक्रारीत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,येथील ईदगाह कॉम्प्लेक्स सुरू झाल्यापासून एकच कमिटी काम करीत आहे. ईदगाह कॉम्प्लेक्सचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे मात्र वक्फ मंडळाला कमी उत्पन्न दाखवून आजतागायत या कमिटीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे असेही तक्रारीत नमूद केलेले आहे.

दिलेल्या तक्रारीत पुढे असेही म्हटले आहे की, सद्यःस्थितीत असलेली कमिटी ही कमी उत्पन्न दाखवून फंड कमी भरत आहेत.त्यामुळे वक्फ मंडळाचे नुकसान होत आहे.यामुळे वक्फ  बोर्डाच्या मालमत्तेचा गैरवापर  होत असल्याचेही तक्रारीत  आरोप आहे.यामध्ये मालमत्ता भाड्याने देण्यामध्ये अनियमितता, तसेच अतिक्रमणधारकांना मालमत्ता ताब्यात देण्याचे प्रकार समोर आले आहेत.ही होणारी कोट्यावधींची रक्कम चौकशी करून वसूल करून घ्यावी तसेच मस्जिदच्या पेश इमाम व मौजम यांना सदरील रकमेमधून पगार व मानधन देण्यात यावे.यापूर्वी अनेकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या मात्र ईदगाह कमिटीची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना काही  चिरीमिरी देऊन संगनमत करून  त्या तत्कालील  चौकश्या दडपण्याचा प्रयत्न झाला होता.

निलंग्यातील अश्या  लोकांना यापुढे मदत केल्यास लातूर जिल्हा वक्फ अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनेद ,चेअरमन समीर. काद्री, सदस्या फौजिया खान ॲड. सलीम व सर्व  सदस्य यांनी झालेल्या अपहाराची रक्कम वसूल नाही केल्यास वक्फ मंडळावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments