Advertisement

हाळी-हंडरगुळीत पाऊसाचे कमबॅक ग्रा.पं.चे मैदान बनले वाॅटर पार्क !!

 हाळी-हंडरगुळीत पाऊसाचे कमबॅक

ग्रा.पं.चे मैदान बनले वाॅटर पार्क !!



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


हंडरगुळी : दि.८,९ व १२ जुन पासून गायब झालेल्या पावसाने दि.२ जुलै रोजी जबरदस्त पुनरागमन केले.एक तास पडलेल्या जोरदार पावसामुळे पेरणी केलेले तसेच न केलेलेही शेतकरी सुखावले आहेत.पाणसाळ नसल्या- मुळे हंडरगुळीच्या ग्रा.पं.समोरील मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरुप आले होते.

एकंदरीत  हा पाऊस कडक ऊन्हात व सोसाट्याच्या वा-यात वाया जाण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांसाठी टाॅनिक ठरला असल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. तसेच मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आजवर पेरणी न केलेले शेतकरी आज दि.२ जुलै रोजी कोसळलेल्या जोरदार पावसामुळे पेरणी योग्य पाऊस पडला म्हणून समाधानी दिसतात.

हा पाऊस या वर्षी आतापर्यंत पडलेल्या पावसापेक्षा मोठा होता.

तसेच आजच्या पावसाचे वैशिष्ट्य म्हणजे ना विजांचा कडकडाट , ना ढगांचा गडगडाट.एकदम शांततेत पण जोरदार पडला.यामुळे शेतकरी व सामान्य गावकरी सुखावले आहेत  गावची संसद असलेल्या ग्रा.पं.पुढील मैदानावर पाणीच पाणी साचल्याने मैदानाला मिनी जलतरण तलावाचे स्वरुप आले होते.

Post a Comment

0 Comments