Advertisement

कोकळगाव येथे एक दिवसीय ग्राम दरबार उत्साहात संपन्न गावकऱ्यांसोबत ,ग्रामस्थांना दिली विविध योजनांची माहिती

 कोकळगाव येथे  एक दिवसीय ग्राम दरबार उत्साहात संपन्न 


गावकऱ्यांसोबत ,ग्रामस्थांना दिली विविध योजनांची माहिती


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा : बुधवार दिनांक 02 जुलै 2025 रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती निलंगा व ग्रामपंचायत कार्यालय कोकळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  एक दिवस गावकऱ्यांसोबत हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करून राहते. महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडी स्वयंपूर्ण व स्वयंशासित असावीत, अशी प्रत्येक गावातील नागरिकांची अपेक्षा असते. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनामार्फत विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात व प्रत्येक योजनेची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना त्या योजनेचा लाभ घेता यावा व त्यातून गावाचा विकास व्हावा यासाठी एक दिवस गावकऱ्यांसोबत हा नावीन्यपूर्ण उपक्रम निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय सोपान अकेले 

 यांच्या मार्गदर्शनाखाली 

 व सरपंच गुरलिंग वाकडे  यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी विविध विभागांचे अधिकारी यांनी आपल्या विभागातील योजनांची माहिती जनसामान्यांना दिली व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व सर्वसामान्य नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, व  कृषी  अधिकारी जाधव सर,  लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुजित बोरसुरीकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय आडे, कृषी विस्तार अधिकारी तिवारी सर, एकात्मिक बाल विकास विभाचे विस्तार अधिकारी जगताप सर, पाणीपुरवठा विभागाचे कुंभार सर, कृषी सहाय्यक पी व्ही तोरंबे,

ग्रामपंचायत अधिकारी धनंजय ढवण तसेच सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी धनंजय ढवण यांनीही  यावेळी नागरिकांना मार्गदर्शन केले.यावेळी  एकूण 147 रुग्णाची आरोग्य तपासणी व  नेत्र तपासणी करण्यात आली  व वृक्ष लागवड व गरोदर मातांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी अभिजीत रुमणे, आरोग्य परिचारिका सी के जाधव,आरोग्य सेवक राहुल भोसले, तसेच आरोग्य विभागाचे सर्व टीम व गाव पातळीवर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी,अंगणवाडी सेविका आशा वर्कर,तसेच ग्रामस्थ आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments