निलंग्यात वंचित बहूजन आघाडीची बैठक संपन्न
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दि.२०मे २०२५ रोजी जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार वंचित बहूजन आघाडीची निलंगा तालुका कार्यकारिणीची पुन्हा बांधणी करण्यासाठी वंचितचे जिल्हा सचिव प्रा.प्रशांत उघाडे यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने दि.२३ रोजी येथील शासकीय विश्रामगृहात पूर्व नियोजीत बैठक संपन्न झाली.या बैठकीसाठी तालुक्यातील वंचितचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीला वंचितचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कांबळे,माजी जिल्हा महासचिव देवदत्त सूर्यवंशी, माजी निलंगा शहर उपाध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी, माजी तालुका अध्यक्ष सुर्यकांत कांबळे, सोनेराव बनसोडे, बालाजी कांबळे, साहेब कांबळे, सिराज शेख, हाज्जू सय्यद अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सदर बैठकीत प्रा. उघाडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आणि निलंगा तालुका कार्यकारिनी पूर्णगठीत / निवडीबाबत दि.२५ मे रोजी व्यापक बैठक घेऊन त्यांच्या मुलाखतीद्वारे कार्यकारीनीची निवड त्याच दिवशी होणार असल्याचे कळविण्यात आले.
इच्छुिकांनी दि.२५ मे २०२५ रविवार रोजी शासकीय विश्रामगृह, निलंगा येथे सकाळी ११.०० वा. बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments