कासार सिरसीसह परिसरात ड्रोन च्या माध्यमातून पीक फवारणी शक्य सेवानिवृत्त इंजिनियर चा अभिनव उपक्रम
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
कासार सिरसी : हैदराबाद येथे इंजिनीयर म्हणून कार्यरत असलेले कासार सिरसी येथील सेवानिवृत्त कर्मचारी दीपक नदीवाडे यांनी त्यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्राचा वापर करत कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवीन तंत्राचा वापर करत या भागात ड्रोन च्या माध्यमातून हवाई पीक फवारणीचा उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी त्यांनी कासार शिरसी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने सहा लाख रुपयाचे कर्ज घेतले आहे या अभिनव उपक्रमाचा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला या फवारणी यंत्रात कमी औषध पाण्याचा वापर करत जवळपास एका तासात पाच एकर पिकावर त्यांच्या उंचीनुसार फवारणी करता येते अशी माहिती देत नदीवाडे यांनी आजच्या युवा पिढीला एक नवा संदेश दिला
माणूस कुठेही गेला तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये आठवण असते ती त्याच्या गावची गावची अनामिक ओढ त्याला सतत खेचत असते आजच्या धावपळीच्या जगात एकदा तरी गावाकडे जावं तिथं मोकळा श्वास घ्यावा आणि पुन्हा स्वतःला शोधावं असं त्याला वाटत असतो
शहरात आपण मिळवतो पैसा प्रतिष्ठा आणि आधुनिकता पण हरवतो शांतता नात्यांची उब आणि माणूस पण म्हणूनच जेव्हा मन थकते तेव्हा आपलं मन गावाकडे वेगाने धावते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दीपक नदीवाडे यांचा उपक्रम
शिक्षण घेतलेल्या प्रत्येकालाच शासकीय नोकरी मिळते असे नाही मात्र प्रत्येक तरुण नोकरीसाठी नानाविध प्रयत्न करत स्पर्धा परीक्षा देतात शेवटी सरकारी नोकरी नाही तरी किमान खाजगी नोकरी मिळावी म्हणून आटोकाट प्रयत्न करतात कुठे खाजगी नोकरी मिळालीच तर तुटपुंजा पगारावर घर चालवणे मुश्किल होते त्यामुळे आज अनेक बेरोजगार पदवीधर तरुण युवक हातात टिकावन फावडे घेऊन आपले नशीब आजमावत असल्याचे चित्र पहाव्यात दिसत असले तरी येणारा काळ हा शेतीचाच आहे शेती परवडत नाही ही मानसिकता फक्त युवा शेतकरीच बदलू शकतो नव्या दमाचे शेतकरी म्हणजेच युवा शेतकरी हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी होऊन दाखवत आहेत अनेक प्रगतशील शेतकऱ्यांचे उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त असते येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे फक्त शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments