Advertisement

कोकळगाव येथे बी एस एन एल सेवेचा बोजवारा; 10 दिवसांपासून मोबाईल सेवा ठप्प

 कोकळगाव येथे बी एस एन एल सेवेचा बोजवारा; 10 दिवसांपासून मोबाईल सेवा ठप्प



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174





 निलंगा : मोबाईल कंपन्यात ग्राहक वाढीची  तीव्र स्पर्धा असतानाच निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील बीएसएनएल‘ चा मात्र पुरता बोजा उडाला आहे.

मोबाईल कंपन्यात ग्राहक वाढविची तीव्र स्पर्धा असतानाच कोकळगाव बीएसएनएल‘ चा मात्र पुरता बोजा उडाला आहे. योग्य आणि तत्पर सेवा मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक दुरावत आहेत. 


कोकळगाव परिसरात मान्सून पूर्व पाऊस पडल्या पासून  10 दिवसांपासून बीएसएनएलची मोबाईल सेवा पूर्णता विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. मात्र त्याकडे यंत्रणेचे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे.


भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच अचानक संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून वारंवार केल्या जातात. हीच गत इंटरनेट सेवेची आहे. इटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांचे व्यवहार खोळंबतात. ग्राहकांचे महिन्याचे मारलेले रिचार्ज फेल जात असल्याने नागरिकांना मधून नाराजीचा सूर उमटत आहे.

एवढेच नव्हे तर थोडासा पाऊस पडला तरी चार ते पाच दिवस बी एस एन एल इंटरनेट ची सेवा विस्कळित होते आहे.यामुळे अनेकदा बँकांचे व्यवहारच बंद राहण्याची वेळ ‘बीएसएनएल’मुळे येत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी भ्रमणध्वनी सेवेतील गलथानपणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी अशी मागणी ग्राहक करत आहे.

Post a Comment

0 Comments