Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरलींग हासुरे यांच्या निर्घृण हत्येची चौकशी करा शिवा संघटनेचा कासार सिरसी येथे मोर्चा

 गुरलींग हासुरे यांच्या निर्घृण हत्येची चौकशी करा 

शिवा संघटनेचा कासार सिरसी येथे मोर्चा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


निलंगा  : कासार सिरशी परिसरातील बडूर गावातील तरुण शिक्षक  

कै. गुरुलिंग  अशोक हासुरे यांची  दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून गुंडाकडून  हत्या करण्यात आली होती. यामुळे 

आरोपीना तात्काळ अटक करुण फाशीची शिक्षा देण्याची शिवा संघटनेच्या वतीने मागणी करत कासार सिरसी येथे मोर्चा काढण्यात आला होता.

 दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी, दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गिरुलिंग हासुरे  गेले असता,गुम्हेगारी गुंड वृतिच्या टोळक्याने, जबर मारहान केल्यामुळे गुरूलिंग यांचा जागीच मृत्यु झाला.  या घटनेमुळे कसार सिरशी परिसरात गावागावात भीतीचे वातवारण निर्माण झाले असून, सामान्य नागरिक भीतीपोटी घराच्या बाहेर पड़त नाहीत. या परिसरात मोठ्या प्रमाणात गुंड गिरीचे प्रमाण  वाढले असून, व्यापारी, शेतकरी, नौकरदार,दूकानदार, मजूर, कामगार सर्वच जनतेमध्ये दहशतीचे वातावर तयार झाले आहे. 

1998 साली कासार सिरशी येथे शिवा संघटनेची बांधनीं प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली  झालेले आहे. परिसरातील गावा - गावात शिवा संघटनेचे शेकड़ो मावळे आज सुद्धा त्याच उमेदिने सक्रिय आहेत. ही घटना आगीसारखी परिसरात पसरली. जनमानसात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. सामान्य जनता पोलिस प्रशासनाकडून  न्याय मिळेल यासाठी अपेक्षा धरुन बसली आहे. 

शिवा संघटनेच्या कासार सिरशी तालुका कार्यकारणीची यावेळी बैठक घेऊन  हासूरे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दिनांक 27 एप्रिल 2025  रोजी सर्व समाज बांधव कासार सिरशीच्या पोलिस स्टेशन येथे धड़क मोर्चा काढला. या मोर्चामध्ये हजारों च्या संख्येने सर्व जाती धर्मातील समाज बांधव उपस्थित होते. या वेळी समान्य लोकामध्ये प्रचंड जनाक्रोश पहायला मिळाला, सर्वाची एकच मागणी होती की, आरोपींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे. यावेळी शिवा संघटनेचे, दत्ताभाऊ खंकरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी पोलिस प्रशासनास, विनंती केली की या प्रकारणाची तात्काळ सखोल चौकशी करून कासार सिरशी परिसरात मध्ये शांततेचे वातावरण निर्माण करावे. अन्यथा शिवा संघटना आक्रमक पवित्रा घेऊन जिल्हाधिकारी, व पोलिस अधिक्षक कार्यालय, लातूर येथे धड़क मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

 या मोर्चासाठी परिसरातील गावागावातुन तरूण युवक, शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास खिंडे,विनोदप्पा   आर्य, दिलीप कत्ते,   ओमकार रटकलर, विश्व नाथ गबुरे, संजय गोला, मयूर गुबरे, दयानंद पाटील,तसेच औंध, बडूर, ओराद, कोराळी, ताम्बाळा, व कासार सिरसी पंचक्रोशीतील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments