रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या विद्युत डीपीकडे महावितरणचे दुर्लक्ष
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
कासारशिरसी : परिसरातील अनेक भागात उघड्या डीपी बॉक्समुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. कासारशिरसी सारख्या वर्दळीच्या ठिकाणच्या अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.परिसरातील धोकादायक स्थितीला असलेल्या डीपींची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. झाडाझुडपात अडकले डीपी रस्त्याच्याकडेला डीपी बसविण्यात आली आहेत. यातील अनेक डीपीचे झाकण गायब असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कासार शिरसी परिसरात अशा अनेक उघड्या डीपी आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी महावितरणला अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत.परंतु, याकडे महावितरण कानाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. उमरगा रोड लगत मारुती मंदिरा शेजारील महावितरण कार्यालयासमोरील उघड्या डीपी असून त्या डीपी चे झाकण नसल्याने या ठिकाणी मंदिर, व शासकीय धान्य गोडावून जवळअसलेल्या डीपी कडे महावितरण कार्यालयाचे अधिकारी काना डोळा करीत असल्याचं नागरिकांतून बोलला जात आहे.
0 Comments