Hot Posts

6/recent/ticker-posts

भव्य शोभायात्रा दिव्य वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषाने कोकळगाव येथील महादेव मंदिरात शिवलिंगाची स्थापना

 भव्य शोभायात्रा दिव्य वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषाने  कोकळगाव येथील महादेव मंदिरात शिवलिंगाची स्थापना 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174





 निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शिवलिंगाच्या मूर्तीची शोभायात्रा, व रात्री बाबा महाराज काटगावकर यांचे कीर्तन तसेच चौदा एप्रिल रोजी सकाळी  होम हवन,  तसेच विविध धार्मिक कार्यक्रम करून शिवलिंग मूर्तीची स्थापना करण्यात आली. 

  भव्य दिव्य अशी शिवलिंग मुर्ती 

प्रतिष्ठापना व महापुजेसाठी विविध मान्यवर यांच्या समवेत अनेक सपत्नीक जोड्या बसवल्या होत्या अनेक वैदिक ब्रह्मांवृंदाच्या हस्ते पुजा करण्यात आली.

गावातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. “ओम नमः शिवाय”, “हरे राम हरे कृष्ण" च्या गजरात शेकडो स्त्री-पुरुष भाविक या  शोभायात्रेत सहभागी झाले होते.महिला मंडळांनी डोक्यावर कलश ठेवून टाळ-मृदंगाच्या तालावर जयघोष करत गावातील सर्व मंदिरांना प्राणप्रतिष्ठेचे विधिवत आमंत्रण दिले. या भव्य मिरवणुकीत शिव-पार्वतीचा सजीव देखावा आणि ब्रम्हा विष्णू महेश गणेश देखावा विशेष आकर्षण ठरले.

यानंतर महादेव मंदिरावर मूर्ती धनधान्य व साखर राशीत ठेवून विधीवत स्थापना करण्यात आली. चौदा एप्रिल रोजी शिवलिंग, नंदी  यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा पूर्ण करण्यात आली. शोभायात्रेला भाविकांचा महासागर उसळला, ज्यामुळे संपूर्ण गावात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.



Post a Comment

0 Comments