कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच भेट
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा : विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, या उद्देशाने निलंगा तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोकळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, या उद्देशामुळे शाळेला मराठवाडा मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने विनोद सगर यांच्या प्रयत्नामुळे पाच संगणक संच भेट दिले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. त्यामुळे शाळेला संगणक मिळावा, अशी मागणी शाळेतील मुख्याध्यापक दिपक कांबळे व सह शिक्षक हरिनंद सगर यांनी केली होती. याची दखल घेऊन मराठवाडा मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने विनोद सगर यांच्या प्रयत्नामुळे शाळेला पाच संगणक मिळवून दिले. तसेच पुणे येथून शाळा स्तरावर पाचही संगणक पोहचविण्याचे श्रेय नितीन आगलावे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिपक कांबळे, सह शिक्षक हरिनंद सगर, एम आय तांबोळी, वीरेंद्र चामे सहशिक्षिका वंदना कांबळे शालेय अध्यक्ष सुरेश लामतुरे, किशोर आगलावे व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
0 Comments