Advertisement

रात्रभर पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन; मद्यपी चालकांवर कारवाई सराईत गुन्हेगारांची धरपकड. ठिकठिकाणी नाकाबंदी

 रात्रभर पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन; मद्यपी चालकांवर कारवाई


सराईत गुन्हेगारांची धरपकड. ठिकठिकाणी नाकाबंदी

32 अधिकारी व 260 पोलीस अमलदारांचा सहभाग.




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174


               

लातूर : बुधवारी  रात्रभर लातूर पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी व संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. रात्री 08.00 वाजता सुरू झालेले कोंबिंग ऑपरेशन पहाटेपर्यंत सुरू होते.

मद्यसेवन केलेल्या वाहनचालकांना थेट ड्रंक अँड ड्राइव्ह च्या केसेस  करण्यात आले असून कोंबिंग ऑपरेशन दरम्यान

33 "गुंडा" आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तसेच  रेकॉर्डवरील 12 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात एकूण 40 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. 

20 मद्यधुंदावस्थेतील वाहनचालकांवर कारवाई केली गेली. 

जिल्ह्यातील  हॉटेल व लॉज चेक करण्यात आले.

विविध गुन्ह्यात फरार व पाहिजे असलेल्या 03 आरोपींना अटक करण्यात आले.

कोंबिंग ऑपरेशनसाठी लातूर जिल्ह्यातील एकूण 32 अधिकारी, 260 पोलीस अमलदार यांचा प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय स्थानिक गुन्हे शाखा, डायल112, चार्ली मोटरसायकल पेट्रोलिंग, दामिनी पथकची गस्त होती. मद्यप्राशन केल्याचा संशय आलेल्या व्यक्तीं वर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या कारवाई करण्यात आली आहे.

 गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. बुधवारी लातुरात ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ही मोहीम रात्रभर सुरूच होती. अनेक सराईत, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. ही कारवाई सुरूच राहणार आहे.

Post a Comment

0 Comments