Hot Posts

6/recent/ticker-posts

बी एस एन एलच्या कमकुवत इंटरनेट मुळे जनता त्रस्त

 बी एस एन एलच्या कमकुवत इंटरनेट मुळे जनता त्रस्त 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




लातूर : निलंगा तालुक्यातील कोकळगाव व परिसरात ५०० च्या वर  बी एस एन एल सेवेचे ग्राहक आहेत. मोबाईलधारकांची संख्या तर प्रचंड आहे. तालुक्यातील कोकळगाव येथे बीएसएनएलसह इतर कंपन्यांनी आपले टॉवर उभे केले असून ते चांगली सेवाही देत आहेत. तरीही बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होताना दिसत नाही. ग्राहकाच्या नेहमीच तक्रारी असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागात बीएसएनएलशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे.


बीएसएनएलवर नियंत्रण कोणाचे?


कोकळगाव परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, बँका ,विविध कार्यालये, व्यवसायिक, आपले सरकार केंद्र, आदी ठिकाणी सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलची सेवा घेतली जाते. पण नेटवर्क आणि स्पीडअभावी या सर्वांची कामे विस्कळीत होत आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांपासून सर्वांनाच बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अतिशय निकृष्ट सेवा देणाऱ्या या सरकारी कंपनीच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बी एस एन एल इंटरनेट ची सेवा चार चार दिवस ठप्प होत असल्याने बी एस एन एल धारक ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बी एस एन एल मधून इतर कंपनी निवडण्याच्या प्रतीक्षेत ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments