Hot Posts

6/recent/ticker-posts

जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत पक्षांना केली पाणपोईची सुविधा

 जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 

जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत पक्षांना केली पाणपोईची सुविधा 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756



निलंगा: दिनांक 20 मार्च जागतिक चिमणी दिन जिवनदीप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 

पक्षांना पाणपोईची सुविधा करुन साजरा करण्यात आला. सध्या उन्हाळा ऋतू सुरू असल्याने, तसेच जागतीक तापमान वाढ, प्रदुशन वाढ, वृक्ष तोड यामुळे पक्षांचा अधिवास कमी होत चालला आहे. त्यांची संख्या कमी होत चालली आहे. पक्षांना पाणी, खाणे मिळणे अवघड झाले आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पाण्याची व्यवस्था करने आवश्यक आहे. जीवनदिप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी पक्ष्यांना  पाणी पिण्यासाठी मातीच्या यळणी,  पाणपोई सुविधा केली जाते. सार्वजनिक समशान भूमी शांती वन येथे महाराजांच्या हस्ते, संगन बसव विरक्त मठ येथे 

संगन बसव महास्वामी जी यांच्या हस्ते, आर्य समाज मंदिर येथे समाजसेवक ऍडव्होकेट अजित शाहीर, सुजित शाहीर, शंकरअप्पा मठपती, माधव सुभेदार, नेताजी सुभेदार यांच्या हस्ते, डी के पाटील इंग्लिश स्कूल निलंगा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुहासिनी पाटील मॅडम यांच्या हस्ते पक्षांना पाणपोई , मातीच्या यळणी झाडांना बांधण्यात आल्या. यावेळी जीवनदिप बहुउद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे गुरुनाथ मोहोळकर, प्रल्हाद मोहोळकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी डॉ.सतीश जाधव, सत्यजीत हिरास, प्रवीण मोहोळकर, हरिभाऊ टोंपे, विठ्ठल पाटील, परमेश्वर पाटील, सोमनाथ मोहोळकर, मल्लिनाथ मोहोळकर, गणेश मोहोळकर, श्रीराम कुंभार, ऍडव्होकेट हेमंत टोंपे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments