हरंगुळ (बु.) येथे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ संपन्न.
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : हरंगुळ (बु) ता. जि. लातूर येथे मंदार येथील श्री. हनुमान मंदिर देवस्थानच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माऊली सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.
दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०८:१५ वाजता हरंगुळ चे माजी सरपंच तथा माऊली सार्वजनिक वाचनालय व ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लोकाधिकारप्रमुख श्री. व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच यावेळी भारताचे संविधान या ग्रंथाचेही पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी डॉ. राम गजधने, गोपाळ मुळे, गहिनीनाथ बरुरे, संभाजी गोरे सर, रामकिशन जाधव सर, संतोष पनाळे, बळीराम कुटवाड, तुकाराम सोनवणे, दत्तात्रय बंडगर, विलास आकारिक, वैभव तिगीले, निवृत्ती कैले, बाबुराव आंधळकर, उद्धव पनाळे, सुधाकर चन्नेवार, वेदांत तिगीले, पवन शेळके, ऋषिकेश हेलाले, विकास तिगीले, शरीफ शेख, समीर आलमले, पवन शेळके, पियुष माळगे, सार्थक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
0 Comments