Hot Posts

6/recent/ticker-posts

कासार शिरसी येथून दोन पायी दिंड्यांचे पंढरपुराकडे प्रस्थान

 कासार शिरसी येथून दोन पायी दिंड्यांचे पंढरपुराकडे प्रस्थान 



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

कासार सिरसी : विठ्ठल दर्शनाची ओढ असलेल्या कासार शिरसी शहरातील माऊली परिवार व विठ्ठल रुक्मिणी परिवारांच्या दोन दिंड्यांचे माघवारी निमित्य गुरुवार दिनांक ३० जानेवारी रोजी पंढरपुराकडे प्रस्थान झाले. या दोन्हीही दिंडीत जवळपास 700 वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून यात महिला भाविकांचा मोठा सहभाग आहे या दिंड्या उमरगा, नळदुर्ग, सोलापूर, तिऱ्हे मार्गे दिनांक 7 फेब्रुवारी पंढरपूरला पोहोचणार आहेत या दिंड्यांना  झाडू संतांचा मार्ग उच्छीष्ठाचा  तो भाग शेष उरला तो घेऊ 

या न्यायाने या दिंड्यांना शहरातील अनेक भाविकांनी निरोप दिला याप्रसंगी दिंडी मार्ग रांगोळ्याने 

सजवण्यात आला होता .

मागील तीस वर्षाची परंपरा असलेल्या येथील माऊली परिवार सेवाभावी संस्था चारिटेबल ट्रस्ट व विठ्ठल रुक्मिणी परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विणेकरी बुद्धिवंत बिराजदार व ज्ञानेश्वर महाराज हसूरीकर दिंडी प्रमुख महावीर पाटील दिंडी चालक बसवराज काजारे व दामू बंडगर नाना जगदाळे मधुकर किवडे व सुभाष यमदे  यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले या भागातील हिप्परगा, कुन्हाळी, रामलिंग मुदगड, कोराळी, हलसीवाडी, दुधनाळ, कदमापूर, नेलवाड, बडूर, हत्तरगा या गावातील वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व वारकऱ्यांना येथील श्री करीब बसवेश्वर मठाचे मठाधिपती गुरु मृगेंद्र स्वामी यांनी मार्गस्थ केले याप्रसंगी हरिभक्त परायण महेश महाराज माकणीकर, धनराज गिरी महाराज नांदेडकर, आशुतोष महाराज कदमापूर, अवधूत पुरी महाराज धानोरा हे उपस्थित होते दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मोहन धायगुडे, किसन कोकणे, अमित जानकर, नवनाथ कोकणे, करबस माळी व महावीर भस्मे सूर्यकांत इंगळे माधव इंगळे विनायक इंगळे हत्तरगा गणपती खिचडे गोविंद जगदाळे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments