नणंद येथे अखंड शिवनाम सप्ताहास प्रारंभ
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
निलंगा: तालुक्यातील मौजे. नणंद, तालुका-निलंगा, जिल्हा- लातूर येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वशांती अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायनास आज पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायनाच्या निमित्ताने आज दिनांक 30 जानेवारी रात्री नऊ वाजता शि. भ. प. संजय महाराज यांचे कीर्तन, दिनांक 31 जानेवारी रोजी संगम बसव महास्वामी महाराज यांचे कीर्तन, एक फेब्रुवारी रोजी भूषण स्वामी महाराज यांचे कीर्तन, दोन फेब्रुवारी रोजी महादेवी मठपती महाराज यांचे कीर्तन, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी धनराज बुलबुले महाराज यांचे कीर्तन,चार फेब्रुवारी रोजी निळकंठ विभूते महाराज यांचे कीर्तन,पाच फेब्रुवारी रोजी नागेश स्वामी महाराज यांचे कीर्तन व दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सद्गुरु विश्वचैतन्य महाराज यांचे महाप्रसादाचे कीर्तन ठेवण्यात आलेले आहे. दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे पाच ते सहा शिवपाठ,सात ते आठ रुद्राभिषेक ,आठ ते दहा परम रहस्य पारायण, 11 ते 1 विश्रांती , एक ते दोन गाथ्यावरील भजन, चार ते सहा प्रवचन, सहा ते सात शिवपाठ व रात्री नऊ ते 11 शिव कीर्तन व रात्री बारा ते पाच शिवजागर असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. एक फेब्रुवारी रोजी तृतीय शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात शिवदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविकांना या शिवमय भक्तीचा लाभ घ्यावा असे आव्हान समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
0 Comments