लातूर जिल्हा बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार प्रदान
शानदार सोहळ्यात बँकेच्या संचालक मंडळाने पुरस्कार स्वीकारला
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर : राज्यातील जिल्हा बँकांत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोल्हापूर येथील आविज पब्लिकेशन कोल्हापूर या संस्थे मार्फत सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेने EXCELLENCE IN CO-OPERATIVE BANKING AWARD -2024 ( बँको ब्लू रिबन पुरस्कार )आंबी व्हॅली सिटी लोणावळा येथे शानदार सोहळ्यात रिझर्व्ह बँकेचे माजी सी .जी. एम. भार्गेश्वर बॅनर्जी , अविनाश शिंत्रेजी, श्री नाईकजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील ,संचालक भगवानराव पाटील तळेगावकर,संचालक मारोती पांडे व बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी हा स्वीकारला आहे .या पुरस्कारामुळे जिल्हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यापूर्वी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार , तसेच राज्य शासन, विविध संस्थांचे अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची गरुड झेप
राज्यात नावलौकिक असलेल्या मोजक्या तीन चार जिल्हा बँकात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असून जिल्हा बँकेने २०२३-२४ या कालावधीत उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन, व्यवसाय वृद्धी, आर्थिक निकषाचे अनुपालन, विविध कर्ज धोरणाची अंमलबजावणी, वसुली इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य केले आहे.बँकेने ग्राहकांसाठी अद्दयावत ग्राहक सेवा ईतर विवीध योजणा राबवून सहकार क्षेत्रात वेगळा पॅटर्न राज्यात निर्माण केला आहे. ५ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना बिन व्याजी पीक कर्जाच्या लाभ मिळवून देणारी लातूर बँक देशात पहिली ठरली आहे. तर शेतकऱ्यांना त्यांचे पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने मोठ्या प्रमाणावर १०० कोटी पेक्षा ज्यादाचे हार्वेस्टर खरेदीसाठी कर्जपुरवठा केलेली अग्रगण्य बँक आहे .आधुनिक शेतीच्या माध्यमातून तरुण पिढी/ उद्योजक घडावेत यासाठी शून्य व्याज दराने तुती लागवड प्रकल्पासाठी पत पुरवठा केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे चेअरमन मा.आ. धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करत आहे .
पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख चेअरमन धीरज देशमुख यांच्या कडून संचालक मंडळ,अधिकारी यांचे कौतुक
लातूर जिल्हा बँकेस बँको ब्लू रिबन पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे चेअरमन ,व्हॉईस चेअरमन सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक विविध खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी यांनी अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून काम केल्याने हा पुरस्कार मिळाला आहे असे सांगून सर्वांचे कौतुक केले आहे.
0 Comments