भुतमुगळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : निलंगा तालुक्यातील भूतमुगळी येथील जि.प.प्रा.शाळेत सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी थोर गणित तज्ञ श्रीनिवास बाल आनंद मेलस्व्य यांच्या जयंतीनिमित्त गणित जत्रा व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी मा सुरेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.तर अध्यक्षस्थानी शा.व्य.समितीचे अध्यक्ष संतोष दरांडे हे होते तर विशेष अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.संतोष स्वामी साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी मा.गणेश दाडगे साहेब, महर्षी दयानंद विद्यालययाचे मु.अ. मा अजय मोरे , केंद्र प्रमुख मा.सुनिल मुळे ,हल्लाळी केंद्राचे केंद्रिय मु.अ. विजयकुमार रावजादे ,तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, महादेव मंदिर कमिटीचे अध्यक्ष माधव सावंत,बीआरसीचे साधनव्यक्ती मा.अतुल देशमुख , अशोक सुरवसे ,माधव हालकरे , विजयकुमार डोइजोडे ,आयटी विभागाचे धिरज आर्य , तसेच गावातील पालक व मान्यवर आदींची उपस्थिती होती.मान्यवरांनी गणित जत्रेनिमीत्त काढलेल्या गणितीय रांगोळी स्टॉल ला भेट देऊन रांगोळींची पाहणी करून बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल ला भेट देऊन खाऊचा आस्वाद घेतले.
0 Comments