Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रिपद देण्याची मागणी

 आमदार अभिमन्यू पवार यांना मंत्रिपद देण्याची मागणी



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756


लातूर: विधान सभेचे आमदार सन्माननीय अभिमन्यू पवार यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अशी आग्रही मागणी औसा मतदार संघासह निलंगा तालुक्यातील 68 गावातील जनतेने केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपर्यंत औसा तालुक्याला मंत्रिपद मिळाले नाही आणि आमदार पवार यांच्या विकासकामामुळे मागील काळात राज्याच्या औसा सह विविध भागातील  समाजामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, त्यांना मंत्रिपद मिळाल्यास संपूर्ण राज्यातील समाजाला न्याय मिळेल व अनेक विकासकामे प्रगतिपथावर येण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा औसा तालुक्यातील व 68 गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आहे.  अत्यंत चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासकामे होतील त्यांच्या रूपाने  मराठवाड्यातील नव्या परिवर्तनाकडे वाटचाल चालू झाली आहे. त्यांच्या रूपाने कुशल संघटन शक्ती असणारा आणि जनते विषयी कणव असलेला नेता मिळाला असून, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास राज्यातील समस्त गोरगरीब जनतेला न्याय मिळेल. त्यांच्या कार्यकुशलतेचा राज्याच्या विकासासाठी नक्कीच हातभार लागेल. अशी आशा औसा मतदारसंघासह 68 गावातील जनतेची आहे. म्हणून त्यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments