Hot Posts

6/recent/ticker-posts

भविष्यात कासार सिरसी हा आदर्श तालुका बनवणार - अभिमन्यू पवार

भविष्यात कासार सिरसी हा आदर्श तालुका बनवणार - अभिमन्यू पवार 


मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

कासार सिरसी: औशाचे  आमदार अभिमन्यू पवार यांच्या उत्कृष्ट सामाजिक व राजकीय कार्याच्या समर्थनास अधिक बळ देण्यासाठी मी त्यांच्याशी जोडला गेलो हे वास्तव मतदारांनी स्वीकारून आपणही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन माजी आमदार बसवराज पाटील यांनी कासार शिरसी च्या जाहीर सभेत मतदारांना केले 

भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रयत क्रांती महासंघ व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ जन आशीर्वाद महासभेच्या वतीने कासार शिरशी सह या भागात ठीक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला.

कासार शिरशी येथील प्रचार सभेत प्रमुख आतिथी बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर हे उपस्थित होते यावेळी त्यांचा पक्ष संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला याप्रसंगी ते म्हणाले की येत्या निवडणुकीत अभिमन्यू पवार हे वीर अभिमन्यू ठरावेत यासाठी मतदार बंधू भगिनींनी त्यांना आशीर्वाद द्यावा असे सांगून या निवडणुकीत जनतेने भाजपाला विजयी करण्याचे आवाहन केले तर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी अभिमन्यू पवार यांना या भागातून मताधिक्य देण्याचे आवाहन केले.

या प्रचार सभेत अभिमन्यू पवार यांचे स्टार प्रचारक बसवराज पाटील म्हणाले की मी कासार शिरशी सह या भागातील मदनसुरी सरवडी कासार बालकुंदा येथील मतदारांना वंदन करतो की आपण अभिमन्यू पवार सारख्या कृतिशील माणसाला निवडून दिले त्याची पावती पवारांनी त्यांच्या कार्यातून देत या भागाचा कायापालट केला हे सत्य स्वीकारत मतदारांनी त्यांना परत संधी द्यावी असे आवाहन करत आजची ही विराट सभा ही त्यांच्या विजयाची सभा असल्याचे सांगितले. 

यावेळी औसा विधानसभेचे उमेदवार  पवार म्हणाले की प्रथम मी कासार शिरसी चा नागरिक आहे, याची जाणीव ठेवत मला या भागाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे कासार शिरसी हे व्यापारी गाव आहे भविष्यात मला या ठिकाणी बाजार समिती एमआयडीसी सह इतर कार्यालय उभी करायची असून, उमरगा कासार शिरसी निलंगा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनवायचा आहे पुढील प्रगतीसाठी आपण मला आशीर्वाद द्यावा मी भविष्यात राज्यात कासार शिरसी हा आदर्श तालुका बनवेल अशी आश्वासन दिले.

याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळूमामा वेल्हाल जेष्ठ कार्यकर्ते बाजीराव जी पाटील, विनोद जी आर्य यांचे सह ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, परमेश्वर बिराजदार,धनराज होळकुंदे जिलानी बागवान,मयूर गबुरे यांचे सह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments