माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची रमेशआप्पा कराड यांनी घेतली भेट
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल माननीय शिवराजजी पाटील चाकूरकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
भाजपा महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर येथील देवघर या निवासस्थानी मंगळवारी सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा पंजाबचे माजी राज्यपाल माननीय शिवराज पाटील चाकूरकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. चाकूरकर आणि आ. कराड यांच्या लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन्ही विधानसभा मतदार संघातील निवडणूक अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी लातूर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, शैलेश पाटील चाकूरकर, अर्चनाताई यांचे जावई कुशाग्रह सिंग मुलगी रुद्रली पाटील, भाजपा किसान मोर्चाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी पंचायत राज सेलचे नवनाथ भोसले उद्योजक जगदीश कुलकर्णी महेंद्र जाधवर यांच्यासह अनेक जण होते.
0 Comments