Hot Posts

6/recent/ticker-posts

लिंबाजी हजारे यांची लोकाधिकार संघ लातूर जिल्हा उपप्रमुख पदी झाली नियुक्ती*

 *लिंबाजी हजारे यांची लोकाधिकार संघ लातूर जिल्हा उपप्रमुख पदी झाली नियुक्ती*



मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

,९८२२०४११७४


लातूर :- लोकाधिकार संघाच्या लातूर जिल्हा उपप्रमुख पदी चाकूर तालुक्यातील जगळपूर येथील श्री. लिंबाजी कोंडीबा हजारे यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख व्यंकटरावजी पनाळे यांनी जाहीर केली आहे.  

लिंबाजी हजारे यांना लातूर जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्त केल्याचे नियुक्तीपत्र लोकाधिकारप्रमुख व्यंकटरावजी पनाळे यांच्या हस्ते दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी लोकाधिकार संघाच्या मुख्य कार्यालयात देण्यात आले आहे. 

लिंबाजी हजारे यांची लातूर जिल्हा उपप्रमुखपदी झालेल्या नियुक्तीचे लोकाधिकार संघाच्या लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारे यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments