*ज्येष्ठागौरीचे घरोघरी थाटात पूजन*
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
लातूर: ज्येष्ठागौरीचे मंगळवारी घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले.गणेशोत्सवाच्या धुमधडक्याच्या आनंदात आणखी भर घालण्यासाठी ज्येष्ठा गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाले आहे. भाद्रपद शुद्ध सप्तमीला चांगला पाऊस घेऊन ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांनीही गौरींचे दुप्पट उत्साहाने स्वागत केले. बुधवारी भाद्रपद शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा गौरींचे भक्तिभावासह घरोघरी मोठ्या थाटात पूजन केले आहे.
ज्येष्ठा गौरीही विविध रूपात भाविकांच्या घरी आहेत. कोणाकडे धातुच्या, कोणाकडे पायलीवर विराजमान होणाऱ्या तर कोणाकडे धान्याच्या. गेल्या अनेक पिढ्यांपासून दरवर्षी नियमितपणे महालक्ष्मीची संपूर्ण कुटुंबिय भक्तीभावाने पूजा करतात. विशेष बाब अशी की, नोकरीनिमित्त कितीही दूर राहत असले तरी कुटुंबिय हे तीन दिवस एकत्र आलेले पाहावयास दिसून आले. या निमित्ताने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या भेटीगाठी, ख्यालीखुशाली तर कळतेच सोबतच काही मंगल कार्यांचीही मूहुर्तमेढ रोवली जाते.
महालक्ष्मीचा भरजरी साडी, कंबरपट्टा, जोडवे, बाजुबंद, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, मोत्यांच्या माळांनी शृंगार केलेला दिसून आला. सुवासिनी यासोबतच सुवासिक फुलांच्या माळा, फुले, आगर्दा, केणा, केवडा याद्वारे महालक्ष्मीला सजवले . त्याचप्रमाणे धान्य, फळांच्या राशी पुढे ठेवल्या होत्या. आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना गोडाचा तीर्थ प्रसाद, फळे दिली जातात. त्यानंतर बुधवारी ज्येष्ठा गौरीचे संपूर्ण कुटुंबीय भक्तिभावाने पंच पक्वान्न बरोबरच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून,आमच्या घरी सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदू द्या अशी प्रार्थना केली.
*नानाविध पक्वांन्नांचा नैवेद्य*
महालक्ष्मीपूजनामध्ये नानाविध पक्वांन्नांचा यात केळीच्या पानावर सोळा भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, कोहळ्याची चवदार भाजी, कढी, खिचडा,भजी, वडे, बोंड, करंजी, लाडू, मोदक, पुरणपोळी, विशेष प्रसाद म्हणून आंबिल, कथली, पात्या, चकल्या यासोबतच विवीध पदार्थांचे नैवद्य दाखविले आहे.
*ग्रामीण भागातही महालक्ष्मी पुढे विविध देखावे*
ग्रामीण भागातही महालक्ष्मी पुढे विविध प्रकारचे देखावे लक्ष वेधून घेत होते. जात्यावर दळण दळताना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शेगडीवर स्वपांक करताना,तर कुठे बांगड्या नेस्वतानाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले आहे.त्यामुळें बाळगोपाळाची देखावे पाहण्यासाठी रेलचेल दिसून येते आहे.
0 Comments