Advertisement

कोकळगाव येथे महापोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात

 कोकळगाव येथे महापोषण अभियान अंतर्गत पोषण मेळावा उत्साहात 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174




 ‌‌निलंगा : केंद्र शासनाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण माह दि. 1 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत दरवर्षीप्रमाणे पोषण विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करून व वेगवेगळे उपक्रम घेऊन पोषणाची लोक चळवळ (जन आंदोलन) उभे करण्याकरिता अतिशय उत्साहात राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोषण अभियानांतर्गत निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे शनिवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी नुकताच पोषण मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्याचे उद्घाटन निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल कामले  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक दिपक कांबळे, हरिदास सगर, एम आय तांबोळी, वसंत सगर अंगणवाडी पर्यवेक्षिका सरोजा बनसोडे, संगीता बनसोडे, कावेरी सूर्यवंशी शिवकन्या बनसोडे, अनिता सगर, दैवशाला सगर, भीमाबाई मंगणे सुवर्णा लोहार, शोभा मुरमे यास्मिन शेख कमलबाई सूर्यवंशी तसेच बाल विकास मदनसुरी प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

या पोषण मेळाव्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाव बेटी पढाव, एक पेढ मां के नाम, लाडकी बहिण,व स्त्रीभ्रूण हत्या  पोषण कविता व पोषण गीते सादर केली. या पोषण मेळाव्यासाठी मदनसुरी विभागांतील 

 २८ अंगणवाडी मधील सेविका व मदतनीस यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी पर्यवेक्षिका सरोजा बनसोडे यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग दिसून आला.




Post a Comment

0 Comments