Hot Posts

6/recent/ticker-posts

मृगाच्या दमदार पावसाने शेतशिवारात पेरण्यांना वेग

 मृगाच्या दमदार पावसाने शेतशिवारात पेरण्यांना वेग

  छाया:- बॉम्बे फोटो निलंगा 


मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174 




लातूर: दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृगाच्या दमदार पावसाने खरिपाच्या पेरण्याना वेग आला आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक मंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील शेतशिवारात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

मागील वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याकारणाने मराठवाड्यात दुष्काळाचे संकट ओढवले होतें. लातूर जिल्ह्यातील भूजल पातळी खालावली होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असल्याने, शेतकरी उत्साहाने पेरणीपूर्व मशागतीची कामे करुन पेरणीमध्ये व्यस्त असतानाचे चित्र पाहावयास मिळते आहे. कित्येक वर्षांनी मृग नक्षत्राचा मुहुर्त साधून पाऊस पडला असल्याने, बळीराजा सुखावला आहे.

Post a Comment

0 Comments