Hot Posts

6/recent/ticker-posts

खरीप हंगाम सन 2023-24 चा 75% पिकविमा तात्काळ द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

खरीप हंगाम सन 2023-24 चा  75% पिकविमा  तात्काळ द्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन 



मुख्य संपादक: द्रोणाचार्य कोळी 

9822041174


लातूर: खरीप हंगाम सन 2023-24 साली जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांनी शेतकरी विमा भरला व नंतर 21 दिवसाचा सलग पावसाचा खंड पडला. त्यानंतर आम्हाला 25% अग्रमी पिक विम्याची रक्कम देण्यात आली. आम्ही शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती कंपनीला दिली होती आणि कंपनीने  पंचनामेही केले होते. पण अद्यापपर्यंत उर्वरित राहिलेले 75% पिकविमा आम्हाला मिळालेला नाही. तरी आमचा राहिलेला 75% पिकविमा प्रशासनाने कंपनीकडून तात्काळ मिळवून द्यावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी सोबत घेऊन प्रचंड अशा प्रमाणात रस्त्यावरचे आंदोलन करेल. या आंदोलनास प्रशासन जवाबदार राहील. यामुळे पून्हा एकदा नम्र विनंती की, दि. 30. जून.2024 पर्यंत आमचा उर्वरित 75% पिकविमा जमा करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल. असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महारुद्र जयलिंग चौंडे,बाळासाहेब माळी ,इब्राहीम बहादुर शेख संजय पंडितराव पाटील, योगेश राजाभाऊ माळी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments