प्रथम स्किल सेंटर येळवट येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी
मुख्य संपादक:द्रोणाचार्य कोळी
9822041174
उप संपादिका: अश्विनी आयतनबोने
औसा : औसा तालुक्यातील येळवट येथील प्रथम स्किल सेंटर मध्ये दिनांक 31 मे 2024 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेंटर हेड इस्माईल तंटे , प्रमुख पाहुणे सदाशिव साबळे , बालाजी भालेराव , अंगुलकुमार सूर्यवंशी , आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिनेश धुळे , सोमनाथ घोडके , प्रशांत बारसे , ईश्वर कांबळे , सतिष कांबळे , सुमित वांडरे , करिष्मा कांबळे , वैष्णवी मोहिते , सुजित साखरे ,प्रवीण जाधव,प्रशांत नेटके यांच्यासह सेंटर मधील मेसन , वेल्डिंग , इलेक्टरीक ,ड्राय वॉल इत्यादी ट्रेड चे अनेक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दिनेश धुळे यांनी केले.
0 Comments