बेशिस्त वाहनधारकांना प्रशासनाने का दिली सुट?
हाळी-हंडरगुळीकरांचा सवाल
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9420010756
हंडरगुळी:- लातुर,उदगीर,अहमदपुर,जळकोट सह जिल्ह्यातील विविध शहरात व मोठ,मोठ्या गावात बेशिस्त वाहन धारकांवर तसेच फटाका सायलंन्सर असलेल्या वाहनांवर कारवाईचा दंडूका चालविणा-या प्रशासनाने हाळी-हंडरगुळी(ता.उदगीर)येथील अशा वाहनधारकांना सुट का दिली? असा प्रश्न जनता,व्यापारी बांधवांना सतावित आहे.
कारण,हाळी-हंडरगुळी येथील राज्य मार्ग,बाजारपेठ,शैक्षणिक एरिया,बस स्थानक,गल्ली बोळ,ग्रा.पं.आणि पोलीस चौकी या म्हत्वाच्या ठिकाणी कांहीजण इंदोरी फटाका सायलेन्सर वाजवित धूम स्टाईल दुचाकीवर हिंडताना तसेच दुचाकीसह अन्य गाड्या बेशिस्तीत पार्क केलेल्या सर्व जनतेला दिसतात.तरीही प्रशासनान अशा वाहनांवर मेहेरबान का झाले? हा गहन प्रश्न सगळ्यांना सतावतोय. जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या वाहनांवर बेधडक दंडूका चालविणारे येथे थंड पडल्यानेच या २ गावात बेशिस्तीत गाड्या पार्क करण्याची तसेच मोठा धमाका करत दुचाकी चालविण्याची स्पर्धा लागली की काय?असा प्रश्न बेशिस्तीत पार्क केलेल्या व फटाका सायलेन्सर वाजवित पळणा-या गाड्यांना बघून अनेकांना पडला आहे.
बाजारपेठ,पोलिस चौकी,राज्यमार्ग हे या २ गावाचे प्रमुख ठिकाण आहे. म्हणुन या ठिकाणावर लहान,मोठ्या वाहनांसह पदचा-यांची सतत मोठी ये-जा असते.आणि याच ठिकाणी शेकडो गाड्या अशा थांबतात की त्यातून प्रवाशी जनता व अन्य गाड्या यांनाच नव्हे तर मुंगीलाही येथून कसे जायचे?असा प्रश्न पडावा,इतका बेशिस्तपणा वाहनधारकांत वाढलाय तसेच दिवसा आणि राञी,बेराञी कांही महाभाग फटाका सायलेन्सर वाजवित मेनरोडसह गल्लीबोळात दुचाकी धूम स्टाईल चालवितात.अन् याचा ञास नवजात बालक व वडील धारी मंडळींना होतोय.तरीही यंञणा चिडीचूप!!
एकीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जो विभाग अशा प्रकरणात डोळ्यात तेल घालून कौतूकास्पद,धडाकेबाज कामगिरी(कारवाई)करताना दिसत आहे.तोच विभाग हाळी-हंडरगुळीत कानाडोळा का करत आहे?या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा बेशिस्त वाहनांमुळे एखादी दुर्देवी घटना घडू शकते.मग कारवाई करण्यात अर्थ काय असा सवाल केला जातो आहे.


0 Comments