शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी केतन सुरवसे तर सचिवपदी स्वाती बिराजदार यांची निवड
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी शासकिय, निमशासकिय,अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी कनिष्ठ सहाय्यक केतन सुरवसे व सचिवपदी स्वाती बिराजदार यांची निवड करण्यांत आली. येथील निलंगा पंचायत समिती कार्यालयात संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिराजदार, छत्रपती संभाजीनगर विभागीय संपर्कप्रमुख चंद्रकांत हवा यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारिणी निवडण्यांत आली. यात तालुकाध्यक्ष केतन सुरवसे,सचिव स्वाती बिराजदार, उपाध्यक्ष सुमित माळशेट्टे, संपर्कप्रमुख बालाजी भोसले,प्रसिध्दीप्रमुख बाळासाहेब सुरवसे, कोषाध्यक्ष संदिप जहागिरदार, सहकोषाध्यक्ष दत्तात्रय उमाटे,संघटक बालाजी यमलवार,महिला प्रतिनिधी राधा सुरवसे, उषा स्वामी, सदस्य नानासाहेब शिंदे,दत्तात्रय सुर्यवंशी, संतोष रड्डे, नाटकर, संदिप बनसोडे, लिंबाजी धैर्य यांची निवड करण्यांत आली.यावेळी नुतन कार्यकारणीचा सत्कार करण्यांत आला.



0 Comments