शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व ओला दुष्काळ जाहीर करा- शिवसेनेची मागणी
मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी
9822041174
निलंगा : पंजाब सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार व ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात निलंगा शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.
मागील एक महिन्यापासून निलंगा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन,उडीद, मूग इत्यादी पिकाचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पाणी थांबल्यामुळे सोयाबीन संपूर्णतः पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक विम्याचे निकष पूर्ववत करावे, ज्यांची घरी पडले आहेत व ज्यांचे पशुधनाचे निधन झाले आहे त्यांना मिळणाऱ्या अनुदानासाठी जे निकष आहेत ते शिथिल करावेत अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपविभाग अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी चव्हाण, उपतालुकाप्रमुख प्रदीप पाटील, सचिन पाटील, निलंगा विधानसभाप्रमुख शिवाजी पांढरे,महिला तालुकाप्रमुख सविता पांढरे, उपतालुकाप्रमुख मंगलबाई कांबळे, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, शहरप्रमुख सुनील नाईकवाडे,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, उपशहरप्रमुख समद लालटेकडे, आयुब शेख जोहर पांढरे, हुजूर मुजावर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.



0 Comments