Advertisement

निलंगा येथील तहसील कार्यालयात घाणीचे साम्राज्य

 निलंगा येथील तहसील  कार्यालयात  घाणीचे साम्राज्य 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9420010756




निलंगा :  ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचे कार्य करणाऱ्या निलंगा येथील तहसील कार्यालय अक्षरशः घाणीच्या विळख्यात सापडले आहे.इमारतीच्या पहिल्याच फ्लोअरवर शौचालयाचे अस्वच्छ दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे या साचलेल्या पाण्यातूनच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तहसील कार्यालय घाणीच्या विळख्यात आली आहे. एकीकडे ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचा संदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्याच कार्यालयात स्वच्छता ठेवता येत नसत्याची विदारक चित्र निलंगा तहसील कार्यालयात दिसून येत आहे. कार्यालयात इमारतीच्या कानाकोपऱ्यात तंबाखू गुटखा पान खाऊन पिचकारीची भिंत लाल रंगल्या आहेत स्वच्छ भारत मिशनचा धिडोरा तहसील कार्यालयात उडाला आहे  त्यामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन वर्षाला करोडो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे त्यास ग्रामीण भागातील लोकांना देखील चांगला पैसा देऊन गाव स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, शौचालय बांधकाम,गटार  मुक्त गाव करण्यासाठी अथक प्ररिश्रम घेतले परंतु तालुक्यातील सर्वात मोठी कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयात मात्र काना कोपऱ्यात प्रचंड अस्वच्छता पसरली असून, हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून येत आहे सरकारच्या आदेशावरून, स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारे जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यास ग्रामीण भागातील लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे .परंतु सरकार ज्या अधिकाऱ्यावर हि जबाबदारी सोपविते  तेच  अधिकारी या स्वच्छतेच्या कामाला हरताळ फासत असल्याचे विदारक चित्र  निलंगा तहसील कार्यालयात दिसत आहेत.इमारतीच्या पहिल्याच फ्लोअरवर प्रचंड प्रमाणात अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः पाण्यातून जावं लागत आहे मोठ्या प्रमाणात  पहिल्याच मजल्यावर अस्वच्छचे पाणी साचले आहे  इमारती मध्ये सामान्य नागरिकांना शौचालय सुधा व्यवस्थित नाही शौचालय नेहमी कुलप बंद असल्याचे दिसते त्यामध्ये कुठलीही स्वच्छता दिसून येत नाही  कार्यालयातच घाणीचे साम्राज्य पसरल्याचे विदारक चित्र निलंगा तहसील कार्यालय मध्ये दिसत आहे हे चित्र आता तहसील कार्यालय इमारतीमध्येच नसून पंचायत समिती निलंगा या कार्यालयामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पान सुपारी खाऊन संपूर्ण भिंती रंगवल्याचे दिसत आहे एकूणच कार्यालयाच्या अचूकतेचा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार  दिसून येत आहे तसेच कार्याच्या भिंती व पंचायत समितीच्या भिंती मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून सदर अस्वच्छतेकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत आता अधिकारीच या घटनेकडे कशा प्रकारे कारवाई करतील  स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत स्वच्छ शासकीय कार्यालये होणार का? हे पहावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments