Advertisement

जिल्हा परीषद निवडणुक लढण्यासाठी उत्का गावच्या सौभाग्यवती अर्चना नंदकुमार राठोड ईच्छुक

जिल्हा परीषद निवडणुक लढण्यासाठी उत्का गावच्या सौभाग्यवती अर्चना नंदकुमार राठोड ईच्छुक 




मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी 

9822041174

मी


औसा : आगामी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या जिल्हा परीषद पंचायत समिती निवडणुकीत अनेक युवक निवडणुक लढण्यासाठी ईच्छुक असुन, लामजना जिल्हा परीषदेसाठी उत्का गावातील नवतरुण युवा उद्योजक तथा कर्जत जामखेड चे आमदार रोहितदादा पवार यांचे निकटवर्तीय  नंदकुमार राठोड यांच्या पत्नी अर्चना नंदकुमार राठोड निवडणुक लढण्यास ईच्छुक आहेत.लामजना जिल्हा परीषद गट हा ओ.बि.सी महिला प्रवर्गासाठी राखीव असुन, लामजना  जिल्हा परीषद गटातुन युवा उद्योजक नंदकुमार राठोड यांच्या सौभाग्यवती अर्चना नंदकुमार राठोड या लामजना गटातुन सक्षम महिला मनुन जिल्हा परीषद निवडणुक लढणार असल्याचे नंदकुमार राठोड यांनी प्रसारमाध्यमांना सांगीतले ,लामजना गटातील महिलांचे सक्षमीकरण व बचत गटाच्या महिला सबलीकरण सह  महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी रणरागिनी म्हणून काम करणार असल्याचे सौ.अर्चना राठोड यांनी सांगीतले ,नंदकुमार राठोड यांनी लामजना परीसरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली असून ,राठोड हे पुणे येथे युवा उद्यौजक म्हणून काम करत असताना अनेक बेरोजगार तरुनांना रोजगाराची संधी देण्याचे कामही  राठोड यांनी केले आहे ,राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष भरत भाऊ सुर्यवंशी ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शामआबा साळुंके ,औसा युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव  ,जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम साळुंके सह पक्षातील आदींनी नंदकुमार राठोड यांच्या उमेदवारीला दुजोरा दीला आहे .लामजना जिल्हा परीषद निवडणुक लढत असताना लामजना गटातील  सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी मी  जनसेवक म्हणून कार्य करणार असल्याचे राठोड यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments